April 19, 2026 4:27 pm

October 2025

दर्जेदार साहित्यिक, सांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे ६ ते ८ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अद्ययावत उर्दू घर उभारणार – अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे

या सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, मराठी व उर्दू साहित्यिक देवाण घेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे ‘उर्दू घर योजना’ आहे. ही योजना अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथून विमानाने सायं ५.१५ वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, अॅड. पराग आळवणी, मुरजी पटेल, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.